– १ लाख ५५ हजारावर अर्ज दाखल
The गडविश्व
गडचिरोली, दि.१६ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा अर्ज नोंदणी करण्यात गडचिरोली जिल्ह्याचा उस्फुर्त प्रतिसाद दिसत असून गडचिरोली जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. जिल्ह्यातून आतापर्यत ६० टक्के महिलांनी अर्ज दाखल केले आहे. त्यात १ लाख ५५ हजार ७१२ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील संभाव्य पात्र महिलांची संख्या सुमारे २ लाख ५८ हजारच्या जवळपास आहे अशी माहिती आहे.
या योजनेत जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, नगरपरिषद प्रशासनाचे उपायुक्त विवेक साळुंखे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, महिला व बालविकासच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी अर्चना इंगोले, बाल विकास प्रकल्प अधिकारी(शहरी) ज्योती कडू तसेच जिल्हा प्रशासनाचे संबंधीत अधिकारी जोमाने काम करीत आहेत. तसेच या योजनेच्या नोंदणी अधिक गतिमान करण्यासाठी शासनाद्वारे नागरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज नोंदणीसाठी प्राधिकृत केले असून यासाठी त्यांना प्रोत्साहन भत्ताही देण्यात येत आहे. यासोबतच लाभार्थींना स्वत: नारीशक्त दूत या ॲपवरही अर्जाची नोंदणी करता येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ५५ हजार ७१२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यात ८५७५ शहरी तर एक लाख ४७ हजार १३७ अर्ज ग्रामीण भागातून प्राप्त झाले आहेत. यात ४१ हजार ९२ अर्ज ऑनलाईन तर १ लाख १४ हजार ६२० अर्ज ऑफलाईन आहेत. यात ग्रामीण भागातून तालुकानिहाय अर्ज नोंदणी केल्यामध्ये अहेरी-७९८६, आरमोरी-८७६१, भामरागड-३७६८, चार्मोशी-२८९३७, देसाईगंज-७७१५, धानोरा-१६५८१, एटापल्ली-१२८३९, गडचिरोली-२००४७, कोरची-७९५७, कुरखेडा-१०८७३, मुलचेरा-१०१६०, सिरोंचा-११५१३ यासोबतच नगरपालिका/नगरपंचायतीच्या शहरी क्षेत्रात एकूण ८५७५ महिलांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #mukhymantri majhi ladki bahin yojna )