The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १७ : तालुक्यातील चिंगली ते भांकरोडी मार्गाची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. तरी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
धानोरा तालुक्यातील चिंगली ते भांकरोडी या गावातील अंतर १० किमी एवढे आहे. यातील ५बकिमी अंतर पुर्णपणे खराब झालेले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. म्हणुन प्रवाशांना व वाहन धारकांना कमालीचा त्रास होत आहे. मार्गामधुन रस्ता काढणे कठिण होत आहे. तरी या रस्त्याची वेळीच दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारक व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora)