– मजुरांवर उपासमारीची पाळी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : तालुक्यात कुठेही सिंचनाच्या सुविधा नसल्याने बहुतेक गावात उन्हाळ्यात रोजगार हमीच्या माध्यमातून गावातच मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने रोहयो चे कामे केले. सालेभट्टी व दुधमाळा ग्रामपंचायत मधील दोन महिन्यापासून तर पन्नेमारा तसेच इतरही ग्रामपंचायत मधील एक महिन्यापासून रोजगार हमीचे पैसे मिळालेले नाहीत. यामुळे मजुरावर व कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु असून या हंगामातच रोजगार हमीचे पैसे न मिळाल्याने दुहेरी संकटामध्ये मजूर वर्ग सापडला आहे .
सरकार एकीकडे खेळाडूंना कोटीचे बक्षिस जाहीर करतात तर दुसरी कडे सरकारला मजुराचे पैसे देण्यासाठी दोन दोन महिने लागत आहे. सरकारचे हे दूटप्पी धोरण नाही का ? आधीच महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे .सिलेंडरचे भाव 990 रुपये आहे. हा मजूर वर्ग हजार रुपये सिलेंडर देऊन कसं काय सोडवेल. जंगलातील सरपन सुद्धा त्यांना गोळा करता येत नाही, सरपण गोळा करायला गेले तर वनविभाग त्यांना अडवतात मग मजुरांनी स्वयंपाक करण्यासाठी आपले हात पायाची लाकडे करून स्वयंपाक करावा का ? असा सवाल रोजगार हमीचे पैसे न मिळालेले धानोरा तालुक्यातील मजूर नागरिक विचारत आहे.
या बाबत पंचायत समिती धानोरा येथील संबंधिताना विचारले असता त्यांनी आमच्यामार्फत ऑनलाईन करून पाठवले आहे. सरकार कडून पैसे आले कि मजुराच्या खात्यात जमा होईल असे सांगितले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora)