गडचिरोली : चकमकीत ठार झालेल्या १२ नक्षल्यांची ओळख पटली, ०७ पुरुष व ०५ महिला नक्षल्यांचा समावेश

1873

– कोरची-टिपागड व चातगाव-कसनसूर दलममधील संपूर्ण सदस्यांचा झाला खात्मा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : आगामी नक्षल सप्ताहाच्या (२८ जुलै ते ०३ ऑगस्ट) पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने कोरची टिपागड व चातगाव कसनसूर दलमचे काही १२ ते १५ नक्षली छत्तीसगड सिमेजवळील वांडोली गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे सात पथक तातडीने सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविणेकामी १७ जुलै रोजी सकाळी रवाना करण्यात आले. सदर नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी जवानांनी नक्षल्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येण्याबाबत आवाहन केले असता, नक्षल्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरंक्षणासाठी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ०७ पुरुष व ०५ महिला नक्षली मृत अवस्थेत आढळले. सदर मृतक नक्षल्यांची ओळख पटली आहे.

मृतकांमध्ये यांचा समावेश

1) योगेश दावसिंग तुलावी ऊर्फ नरेंद्र ऊर्फ निरींगसाय (वय ३६ ) रा. भिमनखोजी तह. कोरची जि. गडचिरोली हा चातगाव-कसनसूर जॉइंट दलम मध्ये डिव्हीसीएम/इंचार्ज पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. त्याच्यावर २८ चकमक, ०४ जाळपोळ, १९ खून, १६ इतर असे एकुण ६७ गुन्हे दाखल होते.

2) विशाल कुल्ले आत्राम ऊर्फ लक्ष्मण ऊर्फ सरदु (वय ४३) रा. गोरगुट्टा तह. एटापल्ली जि. गडचिरोली हा कोरची-टिपागड जॉइंट दलम मध्ये डिव्हीसीएम/इंचार्ज पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. त्याच्यावर ४२ चकमक, १३ जाळपोळ, १५ खून, ०८ इतर असे एकुण ७८ गुन्हे दाखल होते.

3) प्रमोद लालसाय कचलामी ऊर्फ दलपट, (वय ३१ ) रा. वडगाव तह. कोरची जि. गडचिरोली हा कोरची-टिपागड जॉइंट दलम मध्ये डिव्हीसीएम/इंचार्ज पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. त्याच्यावर ३५ चकमक, ०१ जाळपोळ, ०७ खून, १५ इतर असे एकुण ५८ गुन्हे दाखल होते.

4) महारु धोबी गावडे (वय ३१) रा. नैनेर तह. अहेरी जि. गडचिरोली हा चातगाव-कसनसूर जॉइंट दलम मध्ये उपकमांडर / एरीया कमिटी मेंबर (ACM) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर ०६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. त्याच्यावर ०६ चकमक, ०१ जाळपोळ, १० खून, ०३ इतर असे एकुण २० गुन्हे दाखल होते.

5) अनिल देवसाय दर्रो ऊर्फ देवा ऊर्फ देवारी (वय २८ ) रा. मुरकुटी तह. कोरची जि. गडचिरोली हा कोरची-टिपागड जॉइंट दलम मध्ये उपकमांडर / एरीया कमिटी मेंबर (ACM) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर ०६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. त्याच्यावर०८ चकमक, ०१ जाळपोळ, ०२ खून, ०५ इतर असे एकुण १६ गुन्हे दाखल होते.

6) विज्जू, रा. बस्तर एरीया (छ.ग.) हा कसनसूर-चातगाव जॉइंट दलम मध्ये (ACM) एरीया कमिटी मेंबर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर ०६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. त्याच्यावर ०४ चकमक, ०४ इतर असे एकुण ०८ गुन्हे दाखल होते.

7) सरिता जारा परसा ऊर्फ मिना ऊर्फ रामे (वय ३७ ) रा. गळदापल्ली, तह. एटापल्ली जि. गडचिरोली हि चातगाव-कसनसूर जॉइंट दलम (ACM) एरीया कमिटी मेंबर पदावर कार्यरत होती . तिच्यावर०६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. तिच्यावर १५ चकमक, ०१ जाळपोळ, ०४ खून, ०६ इतर असे एकुण २६ गुन्हे दाखल होते.

8) रज्जो मंगलसिंग गावडे ऊर्फ समिता ऊर्फ सिरोंती (वय ३५ ) वर्षे रा. बोटेझरी तह. कोरची जि. गडचिरोली हि चातगाव-कसनसूर जॉइंट दलम (ACM) एरीया कमिटी मेंबर पदावर कार्यरत होती . तिच्यावर०६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. तिच्यावर १३ चकमक, ०४ खून, ०४ इतर असे एकुण २१ गुन्हे दाखल होते.

9) रोजा, रा. बस्तर एरीया (छ.ग.) हि चातगाव-कसनसूर जॉइंट दलम मध्ये (PM) दलम सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

10) सागर, रा. बस्तर एरीया (छ.ग.) हा कसनसूर-चातगाव जॉइंट दलम मध्ये (PM) दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

11) चंदा पोड्याम , रा. माड एरीय (छ.ग.) हा कोरची-टिपागड जॉइंट दलम मध्ये (PM) दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

12) सिता हवके, (वय २७ ) रा. मोरडपार तह. भामरागड जि. गडचिरोली हि कोरची-टिपागड जॉइंट दलम मध्ये (PM) दलम सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. तिच्यावर ०५ चकमक, ०१ जाळपोळ, ०१ खून, असे एकुण ०७ गुन्हे दाखल होते.

सर्व ठार झालेल्या नक्षलींवर एकुण ८६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. मृतक नक्षल्यांवर चकमक, जाळपोळ व खुन इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सदर घटनास्थळावरुन ११ अग्नीशस्त्रांसह ०३ नग एके ४७ रायफल, ०२ नग ईन्सास रायफल, ०१ नग कार्बाइन रायफल, ०१ नग एसएलआर रायफल इ. स्वयंचलीत हत्यार, स्फोटके, डेटोनेटर, बिजीएल व मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस उप-निरीक्षक सतीश पाटील व दोन पोलीस जवान शंकर पोटावी व विवेक शिंगोळे हे जखमी झाले आहेत. अभियानादरम्यान त्यांना हेलीकॉप्टरच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारकामी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे.

सदरचे नक्षल विरोधी अभियान विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी-60 कमांडोंनी यशस्वीपणे पार पाडले. २०२१ पासून गेल्या तीन वर्षात गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ८० कट्टर नक्षल्यांना कंठस्नान, १०२ नक्षल्यांना अटक करण्यात आले आहे व २९ नक्षल्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सी-60 जवानांच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले आहे. पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, संपूर्ण कोरची-टिपागड आणि चातगाव-कसनसूर दलम या ऑपरेशनमध्ये पुसून टाकण्यात आले आहे, त्यामुळे उत्तर गडचिरोलीचा बहुतांश भाग नक्षल्यांच्या प्रभावापासून मुक्त झालेला आहे. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर भागात नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व नक्षल्यांना आत्मसमर्पण करुन आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.

(#thegdv #thegadvisha #gadchirolinews #gadchirolipolice #Naxalattack #naxalencounter)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here