आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची मागणी
The गडविश्व
अहेरी, दि. २३ : मागील ५-६ दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शासनाकडे केली आहे.अहेरी तालुक्यातील अतिवृष्टीने अनेक मार्ग ठप्प पडले होते.
काहींच्या घरात तर काहींच्या दुकानात पाणी शिरले,तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.याची दखल घेत आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्याचा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.