अतिवृष्टिमूळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुबार पेरणीकरीता मदत द्या

193

– काँग्रेसचे मुख्यमंत्री यांना निवेदन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २३ : तालुक्यात मागील दोन दिवसापासून होत असलेल्या सततधार पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण होत खरीप धान पिकाची मोठी नासाडी झाली आहे. या नूकसानीचे तातडीने पंचनामे करीत शेतकऱ्यांना दुबार पेरणीकरीता आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
कुरखेडा तालुक्याची आर्थिक भिस्त ही कृषी वर आधारित आहे. येथे प्रामुख्याने धान पीकाची लागवड करण्यात येते. २१ व २२ जूलै रोजी जिल्हात व तालुक्यात मुसळधार व सततधार पावसामुळे मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने हजारो हेक्टर धान पिक पाण्याखाली सापडत कुजलेले आहे किंवा खरबडून वाहून गेले आहे. जेमतेम परिस्थिती व कर्ज काढत शेती करणाऱ्या येथील शेतकऱ्याला दूबार पेरणी करने अवाक्याबाहेरचे आहे त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करीत दुबार पेरणीकरीता आर्थिक मदत प्रदान करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे एल.
निवेदन देताना तालुका कांग्रेस अध्यक्ष जिवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, माजी जि.प.सदस्य प्रभाकर तूलावी, माजी नगरसेवक उसमान खान, माजी सरपंच तुकाराम मारगाये, युवक काँग्रेस अध्यक्ष प्राजंल धाबेकर, निलकंठ सयाम,भावेश मुंगणकर, माजी सरपंच ऋषी हलामी, अंताराम कमरो, उमेश मुंगणकर, अविनाश हिचामी व कार्यकर्ते हजर होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here