The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २७ : गडचिरोली जिल्हातील जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपरिषदेचा कालावधी पूर्ण होऊनही या स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूका मागील एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या आहेत त्यामूळे सर्वसामान्याचा समस्या मार्गी लावण्याकरीता अडचणी येत आहे या निवडणूकाचा कार्यक्रम तातडीने घोषित करीत विधानसभा निवडणूक पूर्व या घेण्यात याव्या अशी मागणी माजी जि.प.उपाध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट यानी केली आहे.
सध्या केंद्र व राज्यात भाजप प्रणीत सरकार आहे मात्र या शासनाचा स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात विशेष आस्था नाही काही तांत्रिक अडचणीचा बाऊ करीत स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूका लांबविण्यात येत असल्याने स्थानिक स्तरावर नागरीकांचा समस्या मार्गी लावण्याकरीता लोकप्रतिनिधी अभावी अडचणी निर्माण होत आहे या संस्थावर सध्या शासकीय अधिकाऱ्यांची अघोषित हुकूमशाही सूरू आहे. सर्व सामान्याचा आवाज बुलंद करण्याकरीता येथे लोकप्रतिनिधीची गरज आहे. या संस्थावर लोकप्रतिनिधीचा हक्क डावलत शासकीय अधिकाऱ्यांमार्फत सर्व सत्तेची सूत्र आपल्या हाती ठेवण्याची राज्य शासनाची कुटील मानसीकता दिसून येत आहे. सत्तेचे केन्द्रीयकरण ही लोकशाहीचे अवमूल्यन आहे. स्थानिक स्तरावर शासकीय यंत्रणेवर नियंत्रण करीता लोकप्रतिनिधी असने गरजेचे आहे त्यामूळे या रखडलेल्या निवडणूका तात्काळ घेण्यात याव्या अशी मागणी जिवन पाटील नाट यानी केली आहे
(#thegdv #thegadvisvha #gadchirolinews #gadchirolilocalnews)