The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : राष्ट्रपती भवनाने नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचे प्रसिद्धीपत्रक शनिवारी रात्री उशिरा जारी केले. त्यामध्ये महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सी.पी. राधाकृष्णन हे आतापर्यंत झारखंडचे राज्यपाल होते आणि त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. ते मूळचे तमिळनाडूचे आहेत आणि कोईम्बतूर मतदारसंघातून भाजपतर्फे दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. ते तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते रमेश बैस यांची जागा घेतील.
तर महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #maharashtra )