धानोरा : मुसळधार पावसाने रोवणीची कामे खोळंबली

189

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २८ : तालुका परिसरात मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले आहे. पूर स्थितीमुळे ग्रामीण दुर्गम भागातील वाहतूक प्रभावित झाली असताना पावसाने उसंत न घेतल्याने शेतकऱ्यांची रोवणीची कामही खोळंबली आहेत. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असल्याने बळी राजा संकटात सापडलेला आहे.
मागील आठवड्या पासुन धानोरा तालुक्यात पाऊस धो- धो कोसळत असून पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात अनेक घरांची पडझड झालेली आहे तर काही स्लाँपचे घरे सुद्धा गळत असल्याचे पहायला मिळते. दुसरीकडे सुरुवातीला पावसाने दडी मारली उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. शेतकरी रोवणीच्या कामामधे गुंतला असताना पावसाने उसंत घेतली नाही. आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शेतीची रोवनी खोळंबली. पुरामुळे शेतकऱ्यांना शेतात पुन्हा एकदा परे टाकण्याची पाळी आलेली असुन शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला दिसुन येतो आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here