-ठाणेगाव येथील शाळेत शाळा कार्यक्रम
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुक्तिपथ तर्फे शाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १६४ विद्यार्थ्यांना हसत-खेळत व्यसनमुक्त जीवनाचे महत्व पटवून देण्यात आले.
मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ठाणेगाव येथे सघन गाव भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांना अवैध दारूविक्रीविरोधात लढा देण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. अंगणवाडी येथे स्त्री आरोग्य शिक्षण घेण्यात आला. त्यानंतर जिप शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दारू व तंबाखूच्या व्यसनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी खेळ व शिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आम्हची शाळा आहे किती छान, घंटा वाजली टणटण, कृतियुक्त खेळ व गीताच्या माध्यमातून विद्यार्थाना तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. गाणे म्हणणे, सामुहिक खेळ, तंबाखूचे व दारूचे दुष्परिणाम, तंबाखूमुक्तिचे सैनिक, तंबाखू देणाऱ्या मित्राला नाही कसे म्हणनार, सहकारी मित्राला तंबाखू किंवा खर्रा खाण्याच्या सवयी पासून दूर करण्यासाठी प्रयत्न कसे करायचे, तंबाखू मुक्तिची होळी इत्यादी विविध कृतीची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना देण्यात आली. दरम्यान, तालुका संघटक विनोद कोहपरे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम ,ध्येय मांडणी इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर किरमे मुख्याध्यापिका गीता बरडे, पार्वती भुरे, उमेश मसराम, प्रीती चांदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्पार्क कार्यकर्ती दीक्षा तेलकापल्लीवार व आभार स्वीटी आकरे यांनी मानले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )