तनुश्री आत्राम यांनी आंदोलनकर्ते शिक्षकांना दिलेला शब्द पाळला

145

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : विनानुदानित शाळा कृति समितीच्या धरणे आंदोलनाला ३१ जुलै रोजी तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांचा २ ऑगस्ट रोजी दौरा असून आपण त्यांच्याकडे या आंदोलनाची बाब लक्षात आणून देणार असून ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुढील मागण्या मान्य करण्यासाठी बोलणार असल्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार सिनेट सदस्या तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सदर आंदोलन करीत असलेल्या शिक्षक यांच्यासोबत ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट घडवून दिली आणि लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासोबत बोलून आपण सदर आंदोलनकर्ते शिक्षक यांच्या मागण्यांवर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले
दिलेला शब्द तनुश्री आत्राम यांनी पाळल्याचे समाधान आंदोलनकर्ते शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #tanushritaiatram #tanushriatram )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here