धानोरा येथील भ्रमणध्वनी मनोऱ्याची रेंज वाढवा

168

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०३ : धानोरा हा गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागातील अतिदुर्गम भाग असुन धानोरा येथे बीएसएनएल चा भ्रमणध्वनी मनोरा आहे मात्र त्यांची रेंज अपुरी असल्याने धानोरा बाहेरील आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोबाईल रेंज उपलब्ध होत नसल्याने त्यांचे मोबाईल हे खेळणे बनले असल्याने ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे.
धानोरा च्या बाजूला परिसरातील दोन किलोमीटरच्या अंतरावर अनेक गावे असून या गावातील नागरिकांकडे मोबाईल आहेत. मोबाईल हे अत्यावश्यक गरज बनली असल्याने खेड्यापाड्यातील लोकांनी मोबाईल घेऊन त्या मोबाईल मध्ये बीएसएनएलचे सिम घेतले असल्याने त्या बीएसएनएल सिमला रेंज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्याकडे असणारे मोबाईल सध्या शोभेचे वस्तू बनलेली आहे. मोबाईल गरज बनली असल्याने सर्वांच्या उपयोगाचे असून सर्वच गोष्टी मोबाईलवर होतात. संपर्क साधण्यापासून तर डॉक्युमेंट्स मेल करण्यापर्यंत, पैशाचे देवाण-घेवानहीमोबाईलच्या माध्यमातून होत असते. परंतु मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्याने सगळ्यांच्या तोंडचे पाणी पडत असून मोबाईल रेंज साठी परिसरातील लोकांना घराबाहेरील झाडाचा कधी आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे धानोरा येथील बीएसएनएल भ्रमणध्वनी मनोऱ्याची रेंज वाढवून परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी बीएसएनएलच्या ग्राहकांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here