– मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०५ : पत्रकार लोकशाहीतील चौथा स्तंभ असून तालुक्याच्या विकासात पत्रकाराची भूमिका महत्त्वाची आहे तसेच धानोरा येथे सर्वच वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी आहे परंतु धानोरा येथे पत्रकार भवन नाही तसेच समस्या मांडण्याकरता तालुक्यातील लोकांना पत्रकार भावनाच्या इमारतीची नितांत गरज असून धानोरा येथे पत्रकार भवनाकरीता जागा उपलब्ध करून देण्याच्या मगणीचीचे निवेदन ४ ऑगस्ट रोजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले.
धानोरा येथील आदर्श पत्रकार संस्थेचे रजिस्टर झाले असुन रजिस्टर नंबर महा /09/2017 हे आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार संघांना महसूल विभागातर्फे पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाते परंतु धानोरा येथे पत्रकार संघाला स्वतःच्या मालकीचे पत्रकार भवन नाही ही मोठी शोकांतिका आहे. तसेच पत्रकार परिषद घेण्यासाठी पत्रकारांना विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करावी लागते. मात्र कधीकाळी ते देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे आपल्या स्तरावरून आदर्श पत्रकार संघ यांना जागा उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी ना.धर्मरावबाबा आत्राम यांना आदर्श पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष दिवाकर भोयर, सचिव सिताराम बडोदे, उपाध्यक्ष शरीफ कुरेशी, समीर कुरेशी, भाविकदास करमनकर, बंडू हरणे, देवराव कुनघाडकर, ओम देशमुख, बाळकृष्ण बोरकर, श्रावण देशपांडे, मारोती भैसारे आदी मान्यवर उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora )