The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०६ : ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे सोमवार ५ ऑगस्ट रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला व तेथील रुग्णांची तपासणी करून मलेरिया रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर मार्गदर्शन करून ती परिस्थिती कशी कमी करता येईल यावर मार्गदर्शन केले.
धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड होणार नाही, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांन सोबत कसे वागावे. या बद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सांगण्यात आले.
ग्रामीण रुग्णालया धानोरा येथील नवीन निर्माणधीन इमारतीची पाहणी केली. तसेच धानोरा तालुक्यातील रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडून जाणार नाही अशी तंबी देण्यात आली.
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बगराज धुर्वे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र सावसाकडे, राजेश बाट्टूलवार व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanora )