The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने ०३ ऑगस्ट २०२४ रोजी वेदना व्यवस्थापन ओपीडी पार पडली. या ओपीडी मध्ये मुंबईच्या तज्ञ डॉक्टरांनी ६० रुग्णांची आरोग्य तपासणी केली तर १९ रुग्णांना पेन ब्लॉकचे इंजेक्शन देण्यात आले.
पाठीचा कणा दुखणे ,पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे, मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी तसेच पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे,टाचेचे दुखणे, डोकेदुखी यामुळे होणार्या वेदना, कर्करोग आजारांमुळे होणार्या तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या वेदना अशी लक्षणे असलेल्या ६० रुग्णांनी ओपीडी मध्ये तपासणी सुविधेचा लाभ घेतला तर १९ रुग्णांना पेन ब्लॉक इंजेक्शन देण्यात आले. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत देण्यात आली. वेदना व्यवस्थापन ओपीडी दर महिन्याच्या पहिल्या शनिवारला नियोजित असून जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालय करीत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )