The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०८ : तालुक्यातील रांगी परिसराला भ्रमणध्वनी सेवा पुरवण्याकरिता भारतीय संचार निगम लिमिटेडने रांगी येथे उंच मनोरा उभारला पण त्यात बिघाड तांत्रिक आहे की माणूस निर्मिती हे कळायला मार्ग नसल्याने रांगी येथील भ्रमणध्वनी सेवा पूर्णपणे ढेपाळली असल्याचे पहायला मिळते. संबधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने ही भ्रमणध्वनी सेवा रामभरोसे सुरू आहे ती पुन्हा किती दिवस अशिच राहणार असा प्रश्न ग्राहक विचारत असून यावर कायमचा पर्याय तोडगा काढण्याची मागणी रांगी परिसरातील भ्रमणध्वनी ग्राहकांनी केली आहे.
तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा परिसर असून या भागाला भ्रमणध्वनी सेवा उपलब्ध करून देण्याकरिता उंच मनोरा उभारला. शासनाने उभारलेल्या या टावर वरती आयडिया कंपनीची मोबाईल सेवा सुरू असून ती नियमित असते मात्र सरकारने ग्राहकांना दिलेली बीएसएनएलची सेवा मात्र डोके दुखवणारी ठरली असल्याने शेकडो ग्राहक खाजगी कंपनीकडे वळताना दिसत आहेत. याची जाणीव संबंधित विभागाला असतानाही अधिकारी डोळे मिटून फक्त बघायचीच भूमिका घेत असल्याने आता ग्राहक याच अधिकाऱ्यावर शंका घेताना दिसतात. बीएसएनएल कंपनीचे अधिकारी चिरीमिरी घेऊनच कंपनीची सेवा खंडित तर करीत नाही ना अशी शंका ग्राहकांमध्ये उपस्थित केली जात आहे. येथील मोबाईल टावर नेहमीच बंद असते. कधी लाईन गेली म्हणून कधी तांत्रिक बिघाड निर्माण झाला म्हणून सेवा बंद झाल्याचे वारंवार ग्राहकांना सांगितले जाते हे नित्याचीच बाब झाली असून याची माहिती विभागाला असतानाही या विभागाचे पदाधिकारी कुंभकर्णाची झोप घेतात पण सेवा मात्र देत नाहीत. हा भाग डोंगराळ अतीदुर्गम असून आता मोबाईल सेवा अत्यावश्यक झालेली आहे. इंटरने सेवा सुद्धा आवश्यक असताना येथील बीएसएनएल ची सेवा नेहमीच वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकाने नेमके काय करावे, अत्यावश्यक वेळीच सेवा कामात लागत नसेल तर ती कोणत्या कामाची असा प्रश्नही विचारत आहेत. वेळेचे भान ठेवून सेवा सातत्य ठेवायला पाहिजे परंतु वारंवार विभागाच्या होणाऱ्या अक्षम दुर्लक्षामुळेच मोबाईलची भ्रमणध्वनी सेवा कुचकामी ठरत आहे. त्याच मनोऱ्यावर सुरू असलेलील खाजगी कंपनीची सेवा मात्र नित्यनेमाने सुरू असल्याने ग्राहकात संभ्रम निर्माण झाला आहे.
भरपूर दिवस होवुन बीएसएनएल सेवा नियमित होत नाही हि खेदाची बाब असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढून ही सेवा खंड न पडता नियमितपणे सुरू ठेवावी अन्यथा खाजगी कंपनीकडे वळन्याशिवाय ग्राहकांना पर्याय नाही असे ग्राहक बोलून दाखवीत आहेत.
(#thegdv #gadchirolinews #gadchirolilocalnews )