– मुक्तिपथतर्फे उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : देसाईगंज तालुक्यातील आमगाव व कुरुड येथील जिप शाळेमध्ये मुक्तिपथ तर्फे शाळा कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना गाण्यांसह विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्त राहून आपल्या शाळेला तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले.
भावी पिढी तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात न अडकता व्यसनमुक्त राहावे यासाठी सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या या हेतूने मुक्तिपथद्वारे तंबाखूमुक्त व व्यसनमुक्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभरातील शाळांमध्ये करण्यात येत आहे. नुकतेच देसाईगंज तालुक्यातील आमगाव व कुरुड येथील जिप शाळेमध्ये तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनाचे गांभीर्य व होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली. खेळाच्या व गाण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू बाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. सोबतच मुक्तिपथ तालुका टीम व शाळेतील शिक्षकांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम सांगितले. तसेच तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून आपली शाळा तंबाखूमुक्त निर्माण करण्याचे आवाहन केले. आपली शाळा तंबाखूमुक्त कशी करावी, यासाठी मुक्तिपथ टीमने विविध उपाययोजना सुचविल्या.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )