धानोरा प्राथमिक शिक्षक सोसायटीतील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाकडून तीस लाख वसुलीचे आदेश

3527

The गडविश्व
ता. प्र / धानोरा ( दिवाकर भोयर), दि.११ :धानोरा तालुका येथे प्राथमिक शिक्षक सोसायटी मर्या.र.न.७०१ असून येथील सोसायटीत भुखंड खरेदी व बांधकामत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवुन तत्कालीन संचालक मंडळाला जबाबदार ठरवत पदाधिकाऱ्या कडून ३० लाख ७८ हजार वसुली भरण्याचा आदेश प्राधिकारी चौकशी अधिकारी ॲड. रामेश्वर खोंड यांनी दिले आहे.
इमारत बांधकामासाठी शासकीय मालकीची गावठाण भुखंड खरेदी दाखवून नव्याने बांधकाम सुरू करण्यात आले परंतु खरेदी पासुन इमारत बांधकाम वादाच्या भोवऱ्यात अडकले आणि यासंबंधीची वृत्त प्रकाशित झाले होते. चौकशी अधिकाऱ्यांनी गैरव्यवहाराचा ठपका ठेवत आता वसुलीचा आदेश दिला आहे. मागील संचालक मंडळाने धानोरा येथील दंतेश्वरी वार्ड क्रमांक ५ येथे भुमापन क्रमांक ४३५ वरील भुखंड खरेदी केला. भुमापन विभागाने गावठाण असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर रितसर जागेची रजिस्टरी झालेली नाही. अशा जागेवर बांधकाम करण्यासाठी रितसर परवानगी पाहिजे. परवानगी नसतानाही केलेले बांधकाम अनधिकृत आहे. परवानगी नसतानाही येथील बांधकामांवर खर्च केला कसा ? यावर झालेल्या खर्चाला जबाबदार कोण ? इलेक्ट्रॉनिक परवानगी घेतली का ? ईमारत बांधकामांचे सर्च रिपोर्ट काढले का? असे अनेक प्रश्न उपस्थित केल्या गेले. सदर जागा हे धानोरा सीट क्रमांक पाच नगर भूमापन क्रमांक ४३५ आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ व त्याखालील नियम ७२ मधील तरतुदीला अनुसरून ॲड. रामेश्वर बळीराम खोंड प्राधिकृत चौकशी अधिकारी यांनी संस्थेला झालेल्या आर्थिक नुकसानी बाबत चौकशी करून झालेल्या खर्चाच्या रकमेबाबत स्पष्टीकरण विचारणा करुन दोषींनी दिलेल्या खुलासानुसार त्याचप्रमाणे संस्थेने दाखल केलेली पुरावा दर्शक अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेली आहेत. त्यांना निशाणी क्रमांक देण्यात आले आहे. सदर दस्तऐवजाचे व अहवालाचे अवलोकन केले .परिशिष्ट लेखा परीक्षण अहवाल लेखन जबाब व महत्त्वाची संस्थेमधील कागदपत्रे या सर्वांचे सकृत दर्शन अवलोकन केले असता वसुलीच्या परिशिष्टा मधील नमूद सर्व दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर वसुलीच्या परिशिष्टामध्ये नमूद असलेल्या नियमानुसार रकमेसाठी १५ टक्के व्याजाने वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या जबाबदारी निश्चित करुन चौकशी क्रमांक ३९५/२०२३ नुसार दोषीकडून रक्कम पंधरा टक्के व्याजाने गैरव्यवहार झाल्याच्या दिनांकापासून वसूल करण्याचा आदेश दिला आहे.
यात दोषींमध्ये डंबाजी पेंदाम (अध्यक्ष )१० लाख ७८ हजार, विलास दरडे (उपाध्यक्ष) ४ लाख, सुरेश मडावी (सचिव) ४ लाख, ओमप्रकाश सिडाम (सचिव ) ४ लाख, सोमेश्वर कालिदास दुगे (खजिनदार) ४ लाख, गुलाब कुंमरे (संचालक) ५० हजार, शशिकांत सालोटकर (संचालक ) ५० हजार, रायसिंग हरामी (संचालक ) ५० हजार, सोमाजी पदा (संचालक) ५० हजार, भाऊराव उईके (संचालक) ५० हजार, विनोदसिंग कोरेटी (संचालक ) ५० हजार, कुमारी कमल गावडे (संचालिका) ५० हजार, कुमारी वंदना तोडासे (संचालिका) ५० हजार असे एकूण ३० लाख ७८ हजार रुपये २८ जून २०२४ पासून पासुन १५ टक्के व्याजासह वसुलि करण्याचे आदेश प्राधिकृत चौकशी अधिकारी ॲड. खोंड यांनी दिले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #tanushri atram #tanushri dharmrawbaba atram #gadchirolilocalnews #कुरखेडा #kurkheda
#Dhanora #Diwakar Bhoyar Dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here