डॉक्टरांनी रुग्णसेवा करावी, राजकारणात पडू नये : रुपेश वलके

131

राजकारणात उभे राहणाऱ्या डॉक्टरांवर निर्बंध यायला पाहिजे : रुपेश वलके
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे असतांना गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्राच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते आहे. अशातच गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरिता डॉक्टर ईच्छुक दिसत असून डॉक्टरांनी रुग्णांची सेवा करावी, राजकारणात पाय ठेवू नये तसेच विविध बाबींवर अशा डॉक्टर उमेदवारांवर निर्बंध घालण्यात यावे असे मत सामाजिक कार्यकर्ते रुपेश वाळके यांनी आज १२ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेतून केले आहे.
गडचिरोली विंधानसभा क्षेत्राच्या उमेदवारी करीता डॉक्टरांची धरपड असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही काळापासून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉक्टर प्रतिनिधित्व करीत आले आहे मात्र याचा फायदा क्षेत्रातील नागरिकांना होताना दिसत नाही. डॉक्टरांनी राजकारणाच्या भानगडीत न पडता त्यांनी रुग्णाची सेवा करावी, गोरगरीब रंजल्या गाजल्याची सेवा करावी , समाजाची सेवा करावी, आरक्षणाचा फायदा घेऊन हे डॉक्टर झालेले आहेत, राजकारणात उभे राहणाऱ्या डॉक्टरांवर निर्बंध यायला पाहिजे, डॉक्टर राजकारणात उभे राहात असल्यास त्यांनी आपली पदवी हटवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश वलके यांनी केली आहे. यावेळी डॉक्टर जर राजकारणात आले नाही तर आरोग्य मंत्री कोण बनेल, शिक्षक जर राजकारणात आले नाही तर शिक्षण मंत्री कोण बनेल ? असा प्रतिप्रश्न पत्रकारांनी विचारले असता. माझे वैयक्तीक मत आहे असे वलके म्हणाले. येत्या गडचिरोली विधानसभेच्या निवडणुकीत आपणही ताकतीनिशी उभे राहण्याचा सुतोवच रुपेश वालके यांनी पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेला सामाजीक कार्यकर्ते रुपेश वालके, जमील शेख, नरेश बुरे, भारत बुरांडे, तेजश रहाटे, लियाकत शय्यद, अक्षय मेश्राम आदिची उपस्थिती होती.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #vidhansaha election )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here