– मृत वाघाचे वन विभागाकडून नियमानुसार दहन
The गडविश्व
गडचिरोली दि. १२ : वडसा वनविभागांतर्गत वडसा परिक्षेत्रातील उपक्षेत्र वडसा नियतक्षेत्र एकलपूर कक्ष क्रमांक ९७ (राखीव वन) मध्ये गांधीनगर गावानजीक बल्लारपूर- गोंदिया रेल्वे मार्गावर माल वाहतुक रेल्वेच्या धडकेत ४ वर्षीय वाघाचा (मादी) मृत्यु झाल्याची घटना सोमवार १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी, पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार, पशु वैद्यकिय अधिकारी (वन्यजीव) TTC ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, दिपक पी. मेडीकुंटावार, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त, डॉ. मृणाल टोंगे, पशुवैद्यकिय अधिकारी, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत मोका स्थळाची पाहणी केली असता सदर वाघ मृत अवस्थेत आढळून आले. मृत वाघाचा मोकास्थळी पंचनामा नोंदवून मृत वाघाला वडसा परिक्षेत्रातील वडसा येथील रोपवाटिकेत आणण्यात आले. त्यानंतर पशु वैद्यकिय अधिकारी व त्यांच्या चमुने मृत वाघाचे शव विच्छेदनाची प्रक्रिया पुर्ण केली. मृत वाघाचे सर्व अवयव असल्याचे आढळून आले. पंच यांचे उपस्थितीत तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकारणाचे नियमानुसार मृत वाघाला जाळून नष्ट करण्यात आले. संपुर्ण शरीर नष्ट होईपर्यंत सर्व अधिकारी व पंच मोक्यावर उपस्थित होते.
सदरची कार्यवाही धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक (प्रा) वडसा, यांचे मार्गदर्शनाखाली मनोज चव्हाण, उपविभागीय वन अधिकारी, कुरखेडा, श्री विजय धांडे, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) वडसा, एम. जी. मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव, वडसा पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार, पशु वैद्यकिय अधिकारी (वन्यजीव) टीटीसी ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, दिपक पी. मेडीकुंटावार, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त, टीएमव्हीपी वडसा, डॉ. मृणाल टोंगे, पशुवैद्यकिय अधिकारी, अनिल दशहरे, प्रतिनिधी एनटीसीए यांचे उपस्थितीत व वडसा परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी कराडे, तिजारे क्षेत्रसहाय्यक अजय मराठे, आरआरटी व श्री गजभिये, वनरक्षक, भोजराम भुरकुंडे, वनरक्षक, वाहन चालक मनन शेख, वडसा वनविभाग वडसा यांचे सहकार्याने पार पडली असल्याचे वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी कळविले आहे.
गेल्या काही दिवसात रेल्वेच्या धडेकेत वन्यप्राणी ठार झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. बल्लारपूर- गोंदिया मार्ग हा वन्यप्राण्यांना घातक ठरत असून यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणीही वन्यजीवप्रेमिंकडून होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews )