जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे ईव्हीएम मशीन ॲप द्वारे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न

296

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.१३ : येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे २०२४-२५ या वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक ईव्हीएम द्वारे पाडण्यात आली. या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मजबूत लोकशाहीसाठी प्रतिनिधी निवड प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेता आली, शाळेचे मुख्याध्यापक विजय सुरजुसे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना ईव्हीएम ॲप द्वारे प्रत्यक्ष लोकशाहीतील मतदान प्रक्रिया समजून घेता यावी याकरिता उपक्रम राबविण्यात आला. निवडणुकीचा प्रत्येक टप्पा निवडणूक अधिकारी ओम देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सांगितला. मतदान करताना प्रत्येक मतदाराचा (विद्यार्थ्यांच्या) ओळखपत्र पाहून प्रत्येक मतदाराच्या बोटाला शाही लावण्यात आली. निवडणुकीत वर्ग पाच ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा आनंद घेतला. निवडणूक झाल्यानंतर मतपेटीला उमेदवारासमोर सील लावण्यात आली. काही वेळानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली यामध्ये शाळा नायक या पदासाठी कुमारी सुशीला निकेशर वर्ग 10 वा, क्रीडामंत्री आदर्श लेनगुरे वर्ग नववा, स्वच्छता मंत्री संचित देशमुख वर्ग दहावा, सांस्कृतिक मंत्री रुचिका सहारे, पर्यावरण मंत्री अंकुश पदा, महिला मंत्री साक्षी पदा, शालेय पोषण आहार मंत्री निखिल करडेकर, उपमुख्यमंत्री लोकेश मोहुरले, उपक्रीडामंत्री अर्णव कोडापे, उपस्वच्छता मंत्री अनुग्रह मामिडवार, उपसांस्कृतिक मंत्री ओम कस्तुरे यांची निवड झाली यामध्ये उप पर्यावरण मंत्री दिव्यास पोवरे व उपमहिला मंत्री रागिनी आदे यांची बिनविरोध निवड झाली जिंकलेल्या प्रतिनिधींचे शपथविधी घेण्यात आले.
या निवडणुकीत निवडणूक अधिकारी ओम देशमुख, निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत साळवे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याध्यापक विजय सुरजुसे यांनी कार्य पार पाडले तर मोहन देवकते तंत्रस्नेही शिक्षक यांनी ईव्हीएम मशीन अप्स चे प्रशिक्षण दिले. मतदान अधिकारी म्हणून डॉ. रश्मी डोके मॅडम, एन. बी. मेश्राम, प्रशांत तोटावर, शंकर रत्नागिरी, अशोक कोल्हटकर, रजनी मडावी, चेतना दशमुखे मॅडम, रेखा कोरेवार मॅडम, प्रियंका आनंदवार मॅडम, किरण दरडे, देवेंद्र भालेराव, प्रमोद सहारे, हारीश पठाण व बादल वर्गंटीवार यांनी कार्य पार पाडले. ही निवडणूक यशस्वी करण्याकरता भालचंद्र कोटगले, जयराम कोरेटी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here