गडचिरोली : चारचाकी वाहनासह तब्बल २० लाखांचा मुद्देमाल जप्त

156

The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : जिल्ह्यात चारचाकी बोलेरो पिकअप वाहनाने होत असलेली दारू उपपोस्टे जिमलगट्टा पोलीसांनी सापळा रचून जप्त केल्याची कारवाई १३ ऑगस्ट रोजी केली. चारचाकी वाहनासह तब्बल २० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून. सत्यप्रकाश यादव (वय ३६) रा. जिमलगट्टा, तह. अहेरी जि. गडचिरोली याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी छुप्या मार्गाने विक्री व वाहतूक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणा­ऱ्यांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल १३ ऑगस्ट २०२४ रोजी एक इसम बोलेरो पिकअपने जिमलगट्टा ते देचलीपेठा रोडने अवेध दारुची वाहतुक करणार आहे अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दसूरकर, प्रभारी अधिकारी सपोनि. संगमेश्वर बिरादार व त्यांचे एक पथक सदर ठिकाणी रवाना करून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जिमलगट्टा पासून ०२ किमी पुर्वेस जिमलगट्टा ते देचलीपेठा रोडलगत नाल्याजवळ जंगलात सापळा रचून बसले असता सकाळी ०८ वाजताच्या सुमारास जिमलगट्टा कडुन भरधाव वेगात देचलीपेठाकडे एक संशयीत चारचाकी बोलेरो पिकअप वाहन येतांना दिसले. दरम्यान पोलीसांनी वाहन चालकाला थांबवून त्याचे नाव विचारून वाहनाची तपासणी केली असता, त्यात ९० एम.एल रॉकेट देशी दारुचे २१० कागदी कार्टन बॉक्स मिळून आले असून, प्रति कार्टन बॉक्समध्ये १०० नग प्रमाणे एकुण २१,००० नग रॉकेट देशी दारुच्या बॉटल (विक्री किंमत प्रती नग ८०/- रु. प्रमाणे) एकुण १६,८०,०००/- रुपयांचा दारुचा मुद्देमाल व वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन, वाहन क्र. एम एच २६ बी.ई ४५०४ अंदाजे किंमत ३,५०,०००/- रुपये असा एकुण २०,३०,०००/- (अक्षरी वीस लाख तीस हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करून आरोपी आदेश सत्यप्रकाश यादव यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा ल शशिकांत दसूरकर यांच्या नेतृत्वात प्रभारी अधिकारी जिमलगट्टा सपोनि. संगमेश्वर बिरादार, परिपोउपनि. आनंद गिरे, नापोअं केडमवार, नापोअ साखरे, पोअं गणविर व पोअं सुंकरी यांनी पार पाडली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #crimenews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here