अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती व इतरमागासवर्गीय यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या समस्या दूर करा

835

– राहुल दडमल यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा
The गडविश्व
चिमूर, दि. १७ : अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती व इतरमागासवर्गीय यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या समस्या दूर करण्यात याव्या अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहुल दडमल यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र रद्द करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
“महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० मध्ये सुधारणा करण्याबाबत आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन याचे पत्र ७ ऑगस्ट २०२४ ला निर्गमित झाले हे पत्र अनुसूचित जाती, जमाती भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यावर अन्याय करणारे आहे त्यामुळे हे परिपत्रक राज्यपालांच्या सही साठी न पाठविता रद्द करण्यात यावे अशी मागणी व भूमिका राहुल दडमल आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे सल्लागार तथा माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी मांडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र रद्द करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.
यावेळी आमदार बंटीभाऊ बागडीया, गजूभाऊ गुळधे, सुभाष ननावरे महाराष्ट्र अध्यक्ष विद्यार्थी संघटना, संदीप धारने, रणजित सावसाकडे, शंकर ननावरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here