धानोरा : पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करून द्या

181

– जिल्हाधिकारी यांना धानोरा आदर्श पत्रकार संघाच्या वतीने निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १९ : येथील आदर्श पत्रकार संघाच्या वतीने धानोरा येथे पत्रकार भवना करीता आबाधित जागा उपलब्ध करून देण्यात यावी याबाबतचे निवेदन आज १९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी संजय दैने यांना देण्यात आले.
पत्रकार लोकशाहीतील चौथा स्तंभ असून तालुक्याच्या विकासात पत्रकाराची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच धानोरा येथे सर्वच वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहेत. परंतु धानोरा येथे पत्रकार भवन नाही. अतिदुर्गम भागातील समस्या मांडण्याकरता तालुक्यातील लोकांना पत्रकार भवनांच्या इमारतीची नितांत गरज आहे. तसेच पत्रकार संस्थेचे रजिस्टर झाले असून प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार संघांना महसूल विभागातर्फे पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाते परंतु धानोरा येथे पत्रकार संघाला स्वतःच्या मालकीचे पत्रकार भवन नाही हीच मोठी शोकांतिका आहे. तसेच पत्रकार परिषद घेण्यासाठी पत्रकारांना विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करावी लागते. त्यावेळेस ती कधीकधी देण्यास टाळाटाळ करतात आणि म्हणून आपल्या स्तरावरून आदर्श पत्रकार संघ यांना इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध करून द्यावे. यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष दिवाकर भोयर, सचिव सिताराम बडोदे, उपाध्यक्ष शरीफ कुरेशी, समीर कुरेशी , भाविकदास करमनकर, बंडू हरणे, देवराव कुनघाडकर, ओम देशमुख, बाळकृष्ण बोरकर, श्रावण देशपांडे, मारोती भैसारे आदी मान्यवर उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #dhanora )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here