कुरखेडा : पोलिसांनी हातभट्टीची ५२ लिटर मोहफूलाची दारू केली जप्त

226

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २० : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौशी येथे मोहफूलाच्या अवैध दारूची विक्री करण्यात येत आहे या माहीती वरून पोलिसांनी धाड टाकून ५२ लिटर मोहफूलाची दारू जप्त करीत आरोपीला अटक केली आहे.
कुरखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने अवैध दारू विक्री विरोधात धडक मोहीम सूरू करण्यात आली असून काल सोमवार १९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील मौशी येथील मोहफूलाच्या दारू अड्ड्यावर धडक देण्यात आली व येथून ५२ लिटर दारू किमत १५ हजार ६०० रू जप्त करण्यात व आरोपी शिवलाल मुरारी हलामी (वय ३८ ) रा.मौशी याला अटक करून त्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक महेन्द्र वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक संतोष कांबळे, शिपाई प्रकाश साबले, महिला पोलीस शिपाई किरन मडावी यांच्या चमूने केली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolilocalnews #gadchirolinews #kurud #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here