विद्यार्थ्यानी गुणवंत व किर्तीवंत होवून नीतीमंत व्हावे : प्रा. डॉ.नरेंद्र आरेकर

281

– शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : नाव जन्माने मिळतो पण सन्मान मात्र त्याच्या कर्तुत्वाने मिळत असतो म्हणून विद्यार्थ्यांनी गुणवंत व कीर्तीवंत होऊन नितीमंत व्हावे, नावे सर्वांनाच असतात पण त्यांचे काम छान असतात त्यांचे सत्कार होत असतात असे प्रतिपादन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले. ते शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील जे म्हशाखेत्री हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सहसचिव गोविंदराव बानबले, मुख्य मार्गदर्शक प्रा .डॉ. नरेंद्र आरेकर, प्राचार्य डॉ.अविनाश गौरकर, ज्येष्ठ प्रा. किशोर कोल्हे, पत्रकार प्रा. विनोद नागपूरकर उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी पुढे बोलताना प्रा.आरेकर यांनी म्हटले की आजच्या बदलत्या युगात विद्यार्थ्यांनी अपडेट राहून स्वतःला लायक बनवून अनेक लाईक मिळवावे असे प्रतिपादन केले.
यावेळी प्राध्यापक नरेंद्र आरेकर यांनी विविध उदाहरणे देत उपस्थितांची व विद्यार्थ्यांची व पालकांची मने जिंकून घेतले.
यावेळी दहावी बारावीच्या परीक्षेत गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकासह सन्मानचिन्ह व रोख रक्कम देत गौरव व सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील मशाखेत्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करून आपल्या आई-वडिलांचे व गुरुजनांचे व शाळेचे नावलौकिक करून स्वतःचे नाव मोठे करावे असे मार्गदर्शन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक करीत भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्था सचिव गोविंदराव बानबलेले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथील शिक्षणाचा इतिहास उलगडून दाखविला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत प्रकट करून शाळेतील शिक्षकांचे व संस्था चालकांचेआभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिकेश कोडापे सर यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अविनाश गौरकर यांनी केले तर आभार विवेक गलबले यांनी मानले . यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थी व पालक तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here