कुरखेडा : शाळा परिसरात युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

5283

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त होत असतांना कुरखेडा तालुका मुख्यालयात एका युवतीचा मृतदेह जिल्हा परिषद शाळा परिसरात आढळून आल्याची आज सकाळी घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेने शहरात खळबळ उडाली असुन युवतीचे नाव ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम (वय २६) असे आहे.
कुरखेडा शहरातील जिल्हा परिषद आवारात आज सकाळच्या सुमारास क्रिकेट खेळण्याकरीता गेलेल्या युवकांना भिंतीलगत युवतीचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती शहरात पसरताच बघ्यांनी गर्दी केली होती. येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले व कुरखेडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी पोलीस ताफ्यासह घटनस्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. दरम्यान युवतीच्या शरीरावर कुठल्याही मार लागल्याच्या खुणा नाहीत अशी माहिती असून युवतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान मृत युवती ही काल रात्रो १० वाजताच्या सुमारास घरातून बाहेर निघाली होती मात्र उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला होता परंतु ती सापडून आली नाही. आज सकाळच्या सुमारास तिच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना कानी पडताच हंबरडा फोडला. काही दिवसांपूर्वीच एका दुर्घटनेत मुलगा गमावलेल्या आईवर या घटनेने मोठे संकट ओढवले असून तिचा आधाराचा आता संपलेला आहे.
सदर घटनेने शहरात खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here