विविध समस्यांच्या निराकरणासाठी वनविभागातील वनमजुर, वनरक्षक व वनपाल यांची आढावा बैठक संपन्न

431

The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : गडचिरोली वनवृत्तातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याकरीता २३ ऑगस्ट रोजी डॉ. अजय पाटील, केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर, शाखा गडचिरोली यांच्या नेतृत्वात मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली यांच्या दालनात बैठक आयोजीत करण्यात आली होती.
सदर बैठकीत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये वनविभागातील कर्मचाऱ्यांना विशेष कृती कार्यक्रम अंतर्गत एकस्तर पदोन्नतीचा लाभ व १५ टक्के प्रोत्साहन भत्ता ७ व्या वेतन आयोगानुसार देण्यात यावा, बक्षी समितीचा खंड २ लागू करण्यात यावा, महाराष्ट्र नागरी सेवा जेष्ठतेचे विनियमन नियमावली २०२१ लागू करण्यात यावी, विभागीय चौकशी व निलंबन प्रकरणे निकाली काढण्यात यावे, कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तके अदयावत करण्यात यावे, नियतक्षेत्रांचे पुर्नगठन करण्यात यावे, वनरक्षक व वनपाल यांना मदतनिस देण्यात यावे, सिरोंचा वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिले मंजुर करण्यात यावे, संगणक चालक यांचे पि.सी.सी. एफ कार्यालयातील ऑपरेटर प्रमाणे वेतन देण्यात यावे, वनविभागातील वनवसाहत येथील इमारतीचे दुरूस्ती करण्याबाबत , वन्यप्राणी व वन्यजीव व्यवस्थापन कार्यशाळा आयोजीत करणेबाबत, वनमजूरांची सेवाजेष्ठता प्रकाशीत करणेबाबत इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली एस. रमेशकुमार यांनी संघटनेला आस्वाशीत केले.
सदर बैठकीला वृत्त अध्यक्ष सिध्दार्थ मेश्राम , केंद्रीय संघटक पुनम बध्दावार, भारत साबळे, सुनिल पेंदोरकर, किशोर सोनटक्के, सुबिनय सरकार, ईश्वर मांडवकर, अनंत ठाकरे, रूपेश मेश्राम, रवि जुवारे, नितेश तुमपल्लीवार, विकास शिवणकर व संघटनेचे पदाधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर मोठ्या संख्येने उपस्थीत होते .
(#thegadvishva #thegdv #gadchroli news #gadchiroliforest #gadchiroli local news )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here