शक्तिपथने दारू विक्रेत्यांना दिली ताकीद

69

The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे मुक्तिपथ गाव संघटने अंतर्गत शक्तीपथ संघटना गठीत करण्यात आली आहे. या स्त्री संघटनेच्या माध्यमातून गावातील अवैध दारूविक्रेत्यांकडून शपथपत्र लिहून घेत दारूविक्री बंदीची ताकीद दिली.
पळसगाव येथील अवैध दारूविक्री बंदीसाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटना विविध उपाययोजना करीत आहे. गावातील अवैध दारूविक्री विरोधात उपक्रम घेऊन लोकांना दारूचे दुष्परिणाम पटवून दिले जात आहेत. अशातच मुक्तिपथ व गाव संघटनेची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महिलांच्या सुदृढ आरोग्य,आर्थिक, सामाजिक विकास व महिला सक्षम होण्याच्या हेतून शक्तिपथ संघटना गठीत करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका टीमने शक्तिपथ संघटनेची कार्य, उद्देश पटवून दिले. सोबतच अवैध दारूविक्रीमुळे गावाचे होणारे नुकसान या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यांनतर उपस्थित ५६ महिलांनी आपल्या गावातील अवैध दारूविक्री तत्काळ बंद करण्याच्या हेतूने सर्व दारू विक्रेत्यांना स्त्री संघटनेने शपथपत्र दिले. तसेच पुन्हा दारूविक्री करताना आढळून आल्यास योग्य दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here