गडचिरोली : गोवंश तस्करांच्या आवळल्या मुसक्या, १४ गोवंशांची सुटका

1239

– ०२ पिकअप वाहनासह सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : गोवंशाची कत्तलीसाठी अवैधरीत्या तस्करी करीत असतांना धानोरा पोलिसांनी २६ ऑगस्ट रोजी सापळा कारवाई करीत गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान १४ गोवंशाची सुटका करीत वाहनासह तब्बल सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतिक डंबाजी बांबोळे रा. उसेगाव ता. सावली जि. चंद्रपुर, भुवन नामदेव सोनुले (वय 37) रा. सावली ता. सावली जि. चंद्रपुर तसेच पाहिजे असलेला आरोपी गोलु फाले रा. पारडी ता. सावली जि. चंद्रपुर यांच्यावर पोलीस स्टेशन, धानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन पिकअप वाहनांमध्ये जनावरे अवैधरित्या भरुन गोडलवाही वरुन गडचिरोली मार्गे घेऊन जाणार आहे. अशा गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन धानोरा येथील पोलीस पथकाने २६ ऑगस्ट रोजी गोडलवाही फाटा धानोरा मार्गावर सापळा रचुन पाळत ठेवली असता, दोन पिकअप वाहने संशयीतरित्या येतांना दिसुन आल्याने सदर रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करुन दोन्ही वाहनांना थांबवुन सदर वाहनाची तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतीशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले.
वाहन क्रमांक एमएच 34 बी.जी. 5152 महिंद्रा इंम्पेरीओ पिक अप वाहनात 02 बैल तसेच 05 गायी त्याचप्रमाणे वाहन क्रमांक एमएच 34 बी. झेड. 4904 वाहनात 04 बैल व 03 गायी असे एकुण दोन्ही चारचाकी वाहनात 14 जनावरे ज्यांची किंमत 1,15,000/- रुपये किंमतीचे जनावरे व दोन पिकअप वाहन अंदाजे किंमत प्रत्येकी 4,00,000/- रुपये प्रमाणे एकुण 8,00,000/- असा एकुण 9,15,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करु पोलीस स्टेशन, धानोरा येथे गुन्हा दखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी कॅम्प कारवाफा अतिरीक्त कार्यभार उपविभाग धानोरा ल जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे, धानोरा पोनि. स्वप्नील धुळे यांचे नेतृत्वात मपोउपनि. चैत्राली भिसे, पोउपनि. सुमित चेवले, सफौ/टेंभुर्णे, पोहवा/गावडे, रविंद्र मडावी, पोना/बोरकुटे, मानकर, पोशि/ चंद्रशेखर मैंद, शशिकांत मडावी यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #dhanora )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here