गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षल्याचे आत्मसमर्पण

2135

– विविध गुन्ह्यात सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : जाळपोळ, खून व तब्बल १८ चकमकीत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या टिपागड एरिया कमिटी सदस्य टेकनिकल टीम- वेस्ट सब झोनल ब्युरो केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम ( वय ४२) रा. कोसमी नं. – 1 ता. धानोरा, जि. गडचिरोली याने शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. त्याच्यावर शासनाने ०६ लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 673 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
आज आत्मसमर्पण केलेल्या जहाल नक्षली केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम
हा 2002 ते 2007 पर्यंत टिपागड दलम मध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. 2007 ते 2012 टेकनिकल टिम नॉर्थ गडचिरोली डिव्हीजन मध्ये कार्यरत होता. 2012 ते 2020 पर्यंत प्लाटुन 15 (टिपागड एरिया) येथे कार्यरत तर 2020 मध्ये एरिया कमिटी सदस्य पदावर बढती झाली तेव्हापासुन आतापर्यंत टेकनिकल टिम-वेस्ट सब झोनल ब्युरो येथे कार्यरत होता.
त्याचा या कार्यकाळात मानेवारा, बंदुर,बोटेझरी, दराची, गांगीन, किसनेली, कोडुर (माड एरीया) (छ. ग.) यासह तब्बल १८ चकमक, जाळपोळ -०२ , खुन:-०८, ईतर-०६ अश्या एकूण ३४ गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग होता.
शासनाने केदार ऊर्फ मन्या किंजो नैताम याचेवर ०६ लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन त्यास 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 25 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व जसवीर सिंग, कमांण्डट 113 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विश्वंभर कराळे, प्रभारी अधिकारी पोमके सावरगाव यांनी ही कामगिरी पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolilocalnews #naxalarrest #surrender

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here