कुरखेडा : सती नदीपात्रात सुरू असलेल्या मोहफुलाच्या दारूभट्टीवर पोलिसांची धाड
– तिघांवर गुन्हा दाखल
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०३ : तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या वाकडी सतीनदीचा पात्रात मोहफुलाची अवैध दारू भट्टी सुरू असल्याच्या गोपनीय माहीतीच्या आधारे रविवार १ सप्टेंबर रोजी कुरखेडा पोलिसांनी धडक देत अवैध भट्टी उध्वस्त करत ३ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत ६० लिटर दारू जप्त करण्यात आली.
मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे वाकडी सतीनदीच्या पात्रात पोलीसानी धडक दिली. यावेळी आरोपी अंकूश नैताम (वय २८), तूळशीदास राऊत (वय २०) व कूंडलीक उईके (वय ४५ ) सर्व रा.मोहगाव ता. कुरखेडा हे अवैधपणे भट्टी लावत मोहफुलाची दारू गाळत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच घटणास्थळावरून ६० लिटर मोहफूलाची अवैध दारू किमत १८ हजार रू. जप्त करण्यात आली.
सदर कार्यवाही ठाणेदार महेन्द्र वाघ यांचा मार्गदर्शनात कुरखेडा पोलीसानी केली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #kurkheda )