पोलीस – नक्षल चकमक उडाली ; ९ नक्षल्यांना कंठस्नान

3540

– घटनास्थळावरून रायफल, स्फोटके जप्त, सर्व जवान सुरक्षित
The गडविश्व
दंतेवाडा, दि. ०३ : छत्तीसगडच्या दंतेवाडा-विजापूर सीमेवर आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत पोलीस दलाने ९ नक्षल्यांना कंठस्नान घातले. दरम्यान घटनास्थळावरून नक्षल्यांचे मृतदेह, एसएलआर रायफल, ३०३ आणि ३१५ बोअरच्या रायफल, स्फोटके जप्त केल्याची माहिती आहे.
दंतेवाडा-विजापूर सीमेवरील बैलाडिलाच्या डोंगराखालील पुरंगेल, लोहा गावाकडे नक्षली असल्याची गोपनीय माहिती पोलीस दलास २ सप्टेंबर रोजी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार रात्री डीआरजी आणि सीआरपीएफचे जवान शोध मोहिमेसाठी निघाले असता बैलाडिला जंगल परिसरात असलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळबार केला. सुमारे १३ तास चकमक चालल्याचे सांगण्यात येत आहे. चकमकीनंतर पोलीस दलाने घटनास्थळ परिसराचा तपास केला असता ९ नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. यावेळी नक्षल्यांच्या मृतदेहासह एसएलआर रायफल, ३०३ आणि ३१५ बोअरच्या रायफल, स्फोटके तसेच नक्षल्यांचे दैनंदिन साहित्य जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या चकमकीतील सर्व पोलीस जवान सुरक्षित असून ते परतल्यानंतरच अधिक माहिती मिळेल असे सांगण्यात येत आहे.

https://x.com/ANI_MP_CG_RJ/status/1830908689198547402?t=sR4OXsVe8cnmeIeSVKi2TQ&s=19

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #cgpolice #cgnews #naxal #encounter #naxalencounter )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here