कुरखेडा ते गांधीनगर, वडेगांव मार्गावर असलेल्या रपट्याचे बांधकाम करा

170

– माजी सभापती गिरीधर तितराम यांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०५ : तालुका मुख्यालयापासून ते गांधीनगर व पुढे वडेगांव मार्गावर असलेल्या नाल्यावर नविन पुलाचे बांधकाम सूरू आहे. त्यामूळे पुलाच्या बाजूने कच्चा मार्गावरून सूरू असलेली वाहतूक पावसाळ्यात येथे पाणी साचल्याने बंद होती. सध्या पाण्याचा रोष कमी झालेला आहे मात्र पावसाच्या पाण्याने येथे खड्डे पडल्याने येथून वाहन काढणे कठीन ठरत आहे त्यामूळे संबंधित कंत्राटदाराने येथील खड्डे बुजवत व मुरूम गिट्टी टाकत रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी माजी पं.स. सभापती गिरीधर तितराम यानी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुरखेडा अंतर्गत संबंधित कंत्राटदाराकडून सदर बांधकाम अतिशय संथ गतीने सुरूअसल्याने गांधीनगर, आंजनटोला, वडेगाव तसेच गोंदिया जिल्हातील कन्हाळगांव तुकुम येथील नागरिकांना अडचण झालेली आहे. मागील चार महिण्यापासून हा मार्ग रहदारी करीता बंद आहे त्यामूळे लांबचा मार्गाने नागरीकाना प्रवास करावा लागत आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या बाजूने काढण्यात आलेल्या मार्गाची मजबुती करण्याचे कोणतेच काम संबंधित कंत्राटदार किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात न आल्याने नागरीकाना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाला अजुन अवधी असल्याने पुलाजवळून काढण्यात आलेल्या कच्चा मार्गाची तात्काळ दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे अन्यथा बांधकाम विभागा विरोधात ग्रामस्थासह आंदोलन करण्याचा इशारा सूद्धा माजी पं.स.सभापती गिरीधर तितराम यांनी प्रसिद्धि पत्रका द्वारे दिला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here