The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०६ : तालुक्यातील रांगी येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ५ सप्टेंबर २०२४ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. संगीता कावळे ह्या उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अंजुम शेख व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. इयत्ता पाच ते सात मधील विद्यार्थ्यांकरिता स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका निभावून दिवसभर शालेय प्रशासन योग्यरीत्या पार पाडले. सदर कार्यक्रमांमध्ये शाळेच्या उपाध्यक्षा श्रीमती कावळे यांनी शाळेत राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रशंसा केली व गुरुजनांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक दोडके,चांगले, राजगडे, जांगी, बोरसरे, राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा मनोगतातून आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली .
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolilocalnews #gadchirolinews #dhanora )