– अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी कौशल्य युग सुरु झालेले आहे, हाताला कौशल्याची साथ असेल तर कुणीही बेरोजगार राहणार नाही त्यामुळे आरसेटि सारख्या संस्थांमधून कौशल्य आधारित विविध प्रशिक्षण घेऊन बेरोजगारीवर मात करा आणि आपली आर्थिक आणि सामाजिक उन्नती करा असा संदेश गडचिरोली जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी दिला. ते ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटि )येथे बँक ऑफ इंडिया च्या ११९ व्य वर्धापन दिनानिमित्य बोलत होते. या प्रसंगी अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत ढोंगळे, आरसेटि चे संचालक कैलाश बोलगमवार, जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, वैनगंगा कृष्ण ग्रामीण बँकेचे वरिष्ठ
प्रबंधक तथा जिल्हा समन्वयक गजानन मादेशवार, वित्तीय साक्षरता सल्लागार उदय काकपुरे, स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मुख्य प्रबंधक रीना चिचघरे, अग्रणी जिल्हा बँकेचे सतीश तोंडरे पंजाब नॅशनल बँकेचे सुशील धवळे, बँक ऑफ महाराष्ट्र चे प्रबंधक प्रवीण लाटकर, कॅनरा बँकेचे प्रबंधक नवीन कुमार वर्मा, आरसेटि चे वरिष्ठ कार्यक्रम संवयक हेमंत मेश्राम आणि पुरुषोत्तम कुनघाडकर, तसेच बँकेचे ग्राहक नंदुजी कुमरे आणि ब्युटी पार्लर तथा शिवणकला प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रशिक्षणार्थ्याना मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून आर सेटी चे संचालक कैलाश बोलगमवार यांनी आरसेटि ची संकल्पना विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षणार्थी महिलांनी परिश्रम घेतले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolilocalnews )