– कुनघाडा माल व ठाकरी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणामध्ये विकास सुरू असून या क्षेत्राच्या विकासासाठी आपण कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी कुनघाडा माल व ठाकरी येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.
यावेळी कुणघाडा माल येथील पोलीस भरतीत निवड झालेल्या युवकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, धर्मप्रकाश कुकुडकर, कुणघाडा माल सरपंचा मायाताई कन्नाके, उपसरपंच पौर्णिमा गोडगेलवार, पोलीस पाटील मंदाताई तलांडे यांचे सह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.