‘सर्च’ रुग्णालयात ४६ रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया

97

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात डॉ.वाय. एस. देशपांडे व सहकारी टिम ननागपूर (General Surgeon) यांच्या नेतृत्वात दिनांक- ३० व ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. सर्चद्वारे मागील १८ वर्षापासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. ज्या रूग्णांना शरीरावरील गाठी, स्तनातील गाठी, मूळव्याध, भगंदर, अपेंडिक्स,फायमोसिस, हर्निया-हायड्रोसील या प्रकारची लक्षणे असलेल्या ४६ रुग्णांनाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना शस्त्रक्रियेची सुविधा मिळावी यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयाने मोफत जनरल सर्जरी कॅम्पचे आयोजन केले होते . ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन मोफत करण्यात आले. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेससुविधा मोफत देण्यात आली. तसेच रुग्ण व नातेवाईक यांना ब्लॅंकट्स देण्यात आले. गडचिरोली, चंद्रपुर, गोंदिया, भंडारा जिल्हातील रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतलेला आहे. सर्च रुग्णालयात नियमित सर्जरी कॅम्पचे आयोजन केले जाते तरी जास्तीत जास्त रुग्णांनी सर्च मध्ये होणार्‍या ऑपरेशन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे.

(#thegdv #thegadvisvha #gadchirolinews #gadchirolilocalnews #gadchiroli #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here