गडचिरोली : रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करा

58

– आमदार डॉ. देवराव होळी यांची शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना नुकसानीची भरपाई देण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : गडचिरोली तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रानटी हत्तींनी प्रचंड धुडगूस घातला असून शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे जीवितहानीची ही शक्यता बळावलेली आहे करिता भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळण्यासाठी वनविभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी वनविभागाकडे केली आहे.
या रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचे झालेले शेतीचे नुकसान त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची वनविभागाने व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या रानटी हत्ती मुळे सर्वसामान्य लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात लोकांचे जीव जाण्याची शक्यताही बळावलेली आहे. त्यामुळे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाने या संदर्भात तातडीने पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे. करिता वनविभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार डॉ.देवराव होळी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here