The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०१ : विधानसभा क्षेत्रातील विविध घटकांच्या समस्या समजून घेण्यासाठी कुरखेडा काँग्रेस कमिटी तर्फे जनसंवाद परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. सोमवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सांयकाळी ६ वाजेदरम्यान यात्रा कढोली व परीसरातील विविध गावात पोहचत येथील नागरिकांचा अडीअडचणी समजून घेण्यात आल्या.
सदर जनसंवाद यात्रेचा तिसरा दिवस होता. सकाळी सोनसरी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली यानंतर उराडी, सोनेरांगी तसेच परीसरातील ग्रामीण खेडे गावात शेतकरी, युवक, महिला, व्यापारी, विद्यार्थी अशा अनेकांचे प्रश्न समस्या ऐकून घेत यात्रा सांयकाळी कढोली येथील आठवडी बाजारात पोहचली. येथे कार्नर सभा घेत जनतेशी संवाद साधण्यात आला यात्रेत कुरखेडा तालुका काँग्रेस अध्यक्ष जिवन पाटील नाट, काँग्रेस कमिटी कोरची चे अध्यक्ष मनोज अग्रवाल, महिला तालुका अध्यक्ष आशा तुलावी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी, माजी प. स. सभापती गिरीधर तितराम, माजी पं. स.उपसभापती श्रीराम दूगा, माजी नगरसेवक उसमान खान यूवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रांजल धाबेकर, कपील पेंदाम, तुकाराम मारगाये, दामोधर वट्टी भावेश मूंगणकर यांच्या सह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले आहेत.
कढोली येथे सांयकाळी आठवडी बाजारात गावकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक निताराम कुमरे, सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता माधव गावळ यांनी गावकऱ्यांशी प्रत्येक्ष संवाद साधत त्यांचा अडीअडचणी जाणून घेतल्या व या क्षेत्रात व राज्यात सत्ता परिवर्तन करीत आगामी विधानसभा निवडणूकीत जनतेचा समस्या अडिअडचणी समजून जन हिताचे निर्णय घेणारे लोकप्रतिनिधि निवडण्याचे आवाहन केले.