The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०३ : ग्रामपंचायत कार्यालय रांगी येथे २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत रांगी येथील सरपंच फालेश्वरी गेडाम ह्या होत्या. उपसरपंच नुरज हलामी, ग्राम पंचायत अधिकारी बांबोळे. कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत चे सदस्य राकेश कोराम, शशिकला मडावी, अर्चना मेश्राम, विद्या कपाट, दिनेश चापले, शशिकांत साळवे, वच्छला हलामी, सर्व सदस्य आणि अंगणवाडी केंद्र क्र. ०१ चे अंगणवाडी सेविका मंदाबाई दिलीप खोबरे, महिला बचत गटाचे अध्यक्षा सुरेखाताई रंगारी, पेसा मोबिलायजर लीलाताई कन्नाके, संदीप जुवारे (शिक्षक), ग्रामपंचायत संगणक चालक नितीन कावडे, मंदाबाई वालदे, दीपक कुकडकर, नितेश गेडाम, रोशन कन्नाके व गावतील इतर नागरिक उपस्थित होते.
तसेच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, रांगी येथे कार्यक्रम घेऊन “स्वच्छता हि सेवा” उपक्रमा अंतर्गत पी.एम. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा, रांगी अंतर्गत गावातून प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमात गावातील नागरिक मोठ्या संखेत सहभागी होते.