The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात मुंबईचे डॉ. प्रितम पठारे (General Surgeon) यांच्या नेतृत्वात ०७ ते ०८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत आहे.
सर्चद्वारे मागील १८ वर्षापासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्या जाते. ज्या रूग्णांना हायड्रोसील, हर्निया, अपेंडीक्स, शरीरावरील गाठी, मूळव्याध, भगंदर, पित्ताशयातील खडे तसेच गर्भाशयातील अंडाशयाच्या गाठी या प्रकारच्या सर्जरी असतील अश्या रुग्णांचे सर्च दवाखान्यात मोफत सर्जरी करण्यात येईल. ०५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत रुग्णांनी सर्च रुग्णालयात प्रत्यक्ष येउन या शिबिरासाठी आपले नाव नोंदवून घ्यावे. गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेची सुविधा मिळावी यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयाने भव्य मोफत सर्जरी कॅम्पचे आयोजन केले आहे. ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन मोफत राहणार आहे, सर्जरीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेससुविधा मोफत दिल्या जाईल. तरी जनरल सर्जरी कॅम्प करिता रुग्णांनी सर्च रुग्णालयात ०५ ऑक्टोबर पूर्वी येऊन ऑपरेशन साठी नाव नोंदणी करून घ्यावे. येताना आधारकार्ड व रेशनकार्ड सोबत घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )