जारावंडीत रंगणार क्रीडा स्पर्धेचा थरार

681

आश्रमशाळेतील ३६० खेळाडू दाखविणार क्रीडा नैपूण्य
गडविश्व
ता. प्र / भामरागड, दि. ०४ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत कसनसूर केंद्रातील शासकीय व अनुदानीत आदिवासी आश्रमशाळेतील खेळांडूचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जारावंडी येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या मैदानावर शनिवार ०५ ते ०७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सुरु होत आहे.
या स्पधेत कसनसूर केंद्रातील जारावंडी, कसनसूर व हालेवारा था शासकीय तर घोटसूर,भापडा व कोटमी या अनुदानित आश्रमशाळेतील ७८० खेळाडू आप‌ले क्रीडा नैपूण्य दाखविण्यासाठी सहभागी होत आहे.
था केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील, १७ वर्षाखालील व १९ वर्षांखालील मुले व मुली असे तीन वयोगट असुन कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व हँडबॉल या सांघिक खेळा सोबतच धावने, चालने, गोळाफेक, थालीफेक, भाला फेक, लांब उडी व उंच उडी था वैयक्तिक स्पर्धाचा थरार रंगणार आहे. सदर क्रीडा महोत्सव सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नमन गोयल व शेषणाताई चव्हाण सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात संपन्न होत आहे असे कसनसूर केंद्राचे केंद्रसमन्वयक ए. एम. बारसागडे व जारावंडी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बी.एम पंधरे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here