येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला मतदान करा

61

-आमदार डॉ. देवराव होळी यांचे लाडक्या बहिणींना आवाहन
The गडविश्व
गडचिरोली , दि. ०४ : राज्यातील महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचे मानधन सुरू करून आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला , राज्यातील महिलांसाठी प्रवासामध्ये ५० टक्के सवलत दिली, मुलींना शिक्षणामध्ये १०० टक्के सूट देऊन सर्व स्तरावरील शिक्षण मोफत केले, घराची कुटुंब प्रमुख करून आनंदाचा शिधा दिला, असे एक ना अनेक क्रांतिकारक निर्णय राज्यातील महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीला मतदान करून विजयी करावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी पोर्ला येथील लाडक्या बहिणींच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित बहिणींना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मंचावर जिल्ह्याच्या महामंत्री सौ.योगिता पिपरे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर, माजी उपसभापती विलास दशमुखे, पंचायत समितीच्या माजी सदस्या जास्वंदा गेडाम, अनिल चापले, अशोक करणेवार, रवी सेलोटे, संजय चापले, अजय चापले, गणपत चौधरी, दादाजी दशमुखे, संतोष दशमुखे, मनोहर राऊत, गीता चापले, भारती सहारे, निर्मला संदोकर यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पोर्ला परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते करण्यात आले. उपस्थित लाडक्या बहिणींनी आमदार डॉ. देवराव होळी यांचा सत्कार केला. मेळाव्याला परिसरातील लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here