– घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
The गडविश्व
दंतेवाडा, ०४ : गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षल्यांमध्ये आज शुक्रवारला मोठी चकमक उडाली. या चकमकीत तब्बल ३० पेक्षा अधिक नक्षल्यांच्या खात्मा करण्यात पोलीस दलास यश आल्याची माहिती आहे. सदर चकमकीने नक्षल्यांना मोठा हादरा बसला असून देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडच्या दंतेवाडा-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेंदूर आणि थुलाथुली गावांमधील जंगल परिसरात दक्षिण अबूझमाडमध्ये ही चकमक उडाली. विशेष म्हणजे या चकमकीत नक्षल्यांचा एक मोठा कॅडर ठार झाल्याचे कळते. घटनस्थळावरून AK-47 SLR LMG सारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तर या चकमकीत सर्व जवान सुरक्षित असल्यचीही माहिती आहे. सदर चकमकीने नक्षल्यांना मोठा हादरा बसला असून ठार झालेल्या नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
https://x.com/ANI/status/1842199822859718677?t=fhVMxYelhnm7M-5XzxgmBQ&s=19
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #cgnews #cgpolice #naxalarrest #naxalencounter #encounter #naxalbari #dantewada #naraynpur )