गडचिरोली : पोलीस भरतीप्रमाणे ‘वर्ग क आणि ड’ ची स्थानिक भरती झालीच पाहिजे

1069

– बेरोजगार विद्यार्थ्यांची तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषदेतून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि.०५ : जिल्ह्यात अनेक पदे रिक्त आहेत. पोलीस भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येत आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील रिक्त असलेल्या वर्ग क आणि ड वर्गाच्या परदभरतीमध्ये स्थानिकांना विशेष प्राधान्य देऊन जिल्हाभरती घेण्यात यावी अशी मागणी बेरोजगार विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वावर पत्रकार परिषदेतून शनिवारी केली.
गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त, अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात अनेक मूलभूत सुविधा आजही अवासून उभ्या आहेत. जिल्ह्यात आजही अनेक पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात रिक्त असेलेले वर्ग क आणि ड ची पदभरती घेऊन जिल्ह्यातीलच बेरोजगार युवकांना प्राध्यान्य देण्यात यावे, ज्याप्रमाणे पोलीस भरतीमध्ये स्थानिकांना प्राध्यान्य देण्यात येत आहे त्याचप्रमाणे वर्ग क आणि ड चे पदे भरण्यात यावे याकरिता जिल्हा स्टेडियम ते इंदिरा गांधी चौक पर्यंत जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवा- युवतींनी सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.
दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये, स्थानिक बेरोजगार युवक – युवतींनी गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा निवड समिती स्थापन करून त्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्थानिक जिल्ह्यातच भरती करण्यात यावी अशी मागणी रेटून धरली. बाहेरील जिल्ह्यातील व्यक्ती आमच्या जिल्ह्यात येऊन वर्ग (क व ड) मध्ये नोकरी मिळवून गडचिरोली जिल्ह्यात दोन ते तीन वर्ष सेवा बजावून आपली बदली करून आपल्या स्थानिक जिल्ह्यात चालला जातो त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारावर संकट कोसळत आहे. जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थी हा शिक्षण घेऊन सुद्धा त्या नोकरी पासून दूर राहत असल्याचे प्रतिपादनही केले.
पत्रकार परिषदेला गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्री आत्राम,
राहुल भांडेकर ओबीसी संघटना गडचिरोली, ध्यास अकॅडमीचे शुभम, बलविरसिंग राठोड, महेंद्र लटारे, आकाश आंबोरकर, संतोषी सुत्रपवार, निकेश तुनकलवार, मनोज पिपरे,बवैभव सोमनकर, श्रीमंत मुंघाटे,अजय सोमनकर, सूर्यकांत बारसागडे, कार्तिक टिकले, गोपाल उसेंडी, रोहित दुर्गे यांचेसह अनेक बेरोजगार युवक – युवती उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #gadchirolipolice #emploment #tanushriatram #Gadchiroli: Need for local recruitment of class ‘C’ and ‘D’ like police recruitment)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here