– पालकांची गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०६ : तालुक्यातील दुर्गापुर केंद्रा अंतर्गत येणाऱ्या ढोरगट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा ९ आक्टोंबर ला शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
धानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दुर्गापूर केंद्रातील ढोरकट्टा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या २८ असून येथे दोन शिक्षक कार्यरत होते. येथील शिक्षक के.पी. आतला हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या ठिकाणी दुसरे शिक्षक उपलब्ध करून देणे गरजेचे असताना सुद्धा अजून पर्यंत नियुक्त न झाल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे.
कार्यालयीन कामाचा इतर बोजा जास्त असल्याने उपलब्ध शिक्षक शिकविण्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेत. तरी प्रशासनाने ९ ऑक्टोबर पर्यंत शिक्षक उपलब्ध करून द्यावे. अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा गटशिक्षणाधिकारी धानोरा यांना दिलेल्या निवेदनातून गावकऱ्यांनी दिला आहे.
निवेदन देताना सुरेश उसेंडी, चंद्रकला आतला,अशोक उसेंडी, सुरेंद्र चौधरी, काशिनाथ आतला,मंडल, सुरेखा उसेंडी, निरंजना उसेंडी, लता चौधरी आदी गावकरी उपस्थित होते.