– भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन सरकारच्या कामांची माहिती देणार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या क्रांतिकारी निर्णयांची व योजनांची व आमदार म्हणून मी केलेल्या जिल्हा विकासातील कामांची माहिती पार्टी नेतृत्वाने दिलेल्या “घर चलो अभियानाच्या” माध्यमातून घरोघरी पोहोचविल्यास येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाचाच विजय असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या घर चलो अभियानाच्या शुभारंभाच्या बैठकीला उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.
यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत वाघरे , जिल्हा महामंत्री सौ.योगिता पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुक्याचे अध्यक्ष विलास भांडेकर, धानोरा तालुक्याच्या अध्यक्ष लता पुंघाटी, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलासजी दशमुखे, ज्येष्ठ नेते जयराम चलाख, तालुक्याचे महामंत्री बंडू झाडे, शहराचे मंत्री महामंत्री विवेक बैस, नरेश हजारे, विनोद देवोजवार, महामंत्री केशव निंबोड, शहर महिला आघाडी अध्यक्ष कविता उरकुडे, तालुक्याच्या महिला आघाडी अध्यक्ष अर्चना बोरकुटे, धानोरा शहराचे अध्यक्ष सारंग साळवे, नगरसेवक संजू कुंडू यांचे सह विधानसभा क्षेत्रातील तालुका महामंत्री, विविध आघाडीचे अध्यक्ष व महामंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. अभियानच्या माध्यमातून आपण घरोघरी पोहोचल्यास हरियाणा प्रमाणेच महाराष्ट्रातही विजय भारतीय जनता पार्टीचा होईल असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.