उपक्षेत्र अमिर्झा येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा

65

उपक्षेत्र अमिर्झा येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : वनविभागा अंतर्गत उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा तसेच सहाय्यक वन संरक्षक मेडेवार यांचे मार्गदर्शनात चातगाव वनपरिक्षेत्रा मध्ये ०१ ते ०७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत विविध कार्यकम घेउन गावातील लोकांना, शाळेकरी विद्यार्थ्यानां वन व वन्यजिव यांच्या बद्दल माहीती देवून जनजागृती करण्यात आली.
वन्यजीव सप्ताहाचा समारोपीय कार्यकम विध्याभारती विध्यालय आंबेशिवनी येथे ७ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पाडला. या ठिकाणी आंबेशिवनी गावात विद्यार्थ्यांची रॅली काढून वन्यजीवांबाबत जनजागृती करण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात मानव वन्यजीव संघर्ष याबाबत वनविभाग व पोलीस विभागातर्फे कायद्याची माहीती देवून लोकांना विद्यार्थ्याना वन्य प्राण्यांबाबत सागण्यात आले. या कालावधीत विद्यार्थ्याकरिता चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यकमा प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी चातगाव हेमके, वन्यजिव मानद रक्षक मिलींद उमरे यांनी विद्यार्थ्यांना गावातील प्रतिष्टीत नागरीकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याकरिता वाघाबाबतचे चित्रांकित दाखवून वाघाची माहीती देण्यात आली. कार्यकमाला अध्यक्ष म्हणून गावचे प्रथम नागरीक ग्रामपंचायत आंबेशिवनीच्या सरपंचा श्रीमती सरीता उल्हास टेभुर्णे, देवेद्रजी भैसारे पोलीस पाटील आंबेशिवनी, मोहन पाल, विद्याभारती शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. वररखडे, भोयर, विलासजी झंझाळ, रमेशजी चौधरी, जिवन कोवे, अमिर्झा उपक्षेत्रातील अमिर्झा, भिकारमौशी, मोशीचक, बोथेडा, मुरूमबोडी, गिलगाव, कळमटोला, पिपरटोला, धुंडेशिवनी, भरडकरटोली, उसेगाव, आंबेटोला, राजगाटा चक, बामणी, देउडगाव, सावरगाव, कुडखेडा, मधील पोलीस पाटील, सरपंच, वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षक वृंद, प्रतिष्टीत नागरीक, वनकर्मचारी उपस्थित होते.
निबंध व चित्रकला स्पर्धेत नावीन्य पूर्ण आलेल्या विद्याभारती विद्यालयातील कु. मिनल संजय कारेते वर्ग १२ वी, कु. सेजल संजय कारेते वर्ग १० वी यांनी प्रथम कमांक तर कुमार श्रेयश बहादुर गावडे वर्ग १२ वी, कु. श्वेता प्रकाश बाबनवाडे वर्ग ९ वा यांनी द्वितीय कमांक आणि कु. भाग्यश्री जनार्धन निकुरे वर्ग १२ वा, कु. यगीनी राजेंद्र पाल वर्ग ८ वा यांनी तृतीय कमांक पडकाविला तसेच जिल्हा परिषद विद्यालयातील आंबेशिवनी मधील कु. सुहाना संजय कारेते वर्ग ७ वा, कुमार ईशांत संदिप पाल वर्ग ४ था यांने प्रथम कमांक तर कुमार अंकुश अनिल मरापे वर्ग ५ वा, कुमार वंश महेश सहारे वर्ग ३ रा यांनी द्वितीय कमांक आणि डिम्पल बालाजी भोयर वर्ग ७ वा मनस्वी महेश सातारे वर्ग ३ रा यांनी तृतीय कमांक पटकाविला. विध्यार्थ्याना प्रशस्ती पत्र व रोख बक्षीस देवून गौरविण्यात आले. कार्यकमाचे सुत्र संचालन सागर आत्राम जि. प. शाळा आंबेशिवनी यानी केले तर कार्यकमाचे प्रस्ताविक एस. एम. मडावी क्षे. स. झरी यांनी केले व आभार रूपेश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता आर. एच. तांबे क्षेत्र सहाय्यक अमिर्झा व त्याचे चमू यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here