अपघात विमा खचलेल्या कुटुंबाला जगण्याचे बळ देते : चांगदेव फाये

134

– मृतक मनिष लोहबंरे यांचा कुटुंबाला १० लाखाचा अपघात विम्याचा धनादेश प्रदान
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०९ : अपघात ही अप्रिय व कटू घटना असली तरी अनेकांना नकळत हा आघात सहन करावा लागतो. अनेक कुटुंबं अपघातामूळे उध्वस्त होतात. घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने मोठी विवंचना त्यांचा समोर असते यावेळी अपघात विमा हा जिवन परत मिळवून देऊ शकत नसला तरी उध्वस्त कूटूंबाला जगण्याचे बळ मात्र निश्चित देतो त्यामुळे सर्वांनी शासन पुरस्कृत अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी केले.
मागील दोन महिण्यापूर्वी कुरखेडा – वाकडी मार्गावर मनिष यादवराव लोहबंरे (वय २५ ) या युवकाचा रस्ता अपघातात मृत्यु झाला होता. घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला होता. मृतकाने केंद्र शासन पुरस्कृत भारतीय पोस्ट विभागाचे वार्षिक ३९९ रूपयाची अपघात विमा पालीसी घेतली होती. विभागाद्वारे त्यांचा अपघात विमा दावा मंजूर करण्यात आला व त्याच्या कुटुंबाला येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात १० लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भारतीय पोस्ट विभागाचे विभागीय व्यवस्थापक कैलाश काकडे कुरखेडा शाखा व्यवस्थापक अभय किरकटे, कर्मचारी उमेश धमगाये, रमन राज, वैभव भावसार, नारायण आदमपूरे, अमोल पवार, लोकेश हटवार, मृतकाचा भाऊ छगन लोहबंरे तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, शहर अध्यक्ष सागर निरंकारी, तालुका महामंत्री प्रा. विनोद नागपूरकर आदि हजर होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda #accidentpolicy #postoffice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here